संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

ममता बॅनर्जींचे 22 नेत्यांना पत्र

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोलकाता- नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकांनंतर आता अवघ्या देशाचे लक्ष राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीकडे लागले आहे. यासाठी विरोधकांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 15 जून रोजी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबतच्या संयुक्त बैठकीत सहभागी होणार आहेत. यासाठी ममता यांनी 22 नेत्यांना पत्रही लिहिले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आदी नेत्यांसह काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही पत्र लिहून बैठकीत सहभागी होण्याची विनंती केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami