संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

मनालीच्या सौंदर्यात कंगनाचे घर खुलून दिसतेय! सोशल मीडियावर चर्चा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

शिमला – परगावी किंवा परदेशी आपल्या मेहनतीने मोठ-मोठे महाल उभारले तरी आपल्या गावात आपण बांधलेल्या छोट्याशा घराची सर त्यांना येत नाही, असे म्हणतात ते काही खोटे नाही. म्हणूनच की काय सेलिब्रिटींची नाळ कायम आपल्या मातीशी जोडलेली पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर कंगना राणावतच्या मनातील घराची प्रचंड चर्चा आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगनाने तिच्या गावी हिमाचलमध्ये तिचे घर नव्याने सजवले आहे, जे मनालीच्या सौंदर्यात अतिशय खुलून दिसतेय, अशा प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करत आहेत.

मनालीमध्ये वसलेल्या या घराचा एक कोपरा असा सजवला केला आहे की, त्यातून संपूर्ण मनालीच्या परंपरेचे दर्शन घडते. याशिवाय घरातील पाहुण्यांच्या खोलीपासून ते बेडरूमपर्यंत सारेकाही आकर्षक आहे. एका छायाचित्रात कंगना घराच्या बाल्कनीतून बाहेरील सौंदर्य पाहताना दिसतेय. तिने आपल्या घराची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले आहे, ‘सर्व उत्साही लोकांसाठी येथे काहीतरी आहे, ज्यांना सजावट आवडते आणि पर्वतीय वास्तुकलेबद्दल उत्सुकता आहे जी प्राचीन आणि पारंपरिक गोष्टींशी संबंधित असते…मी नवीन घर बांधले. मनालीतील माझ्या सध्याच्या घराचा हा विस्तार आहे पण यावेळी मी ते इथल्या प्राचीन वस्तूंशी जोडून ठेवले आहे. नदीचे दगड, स्थानिक स्लेट आणि लाकडापासून बनवलेली पर्वतीय शैली. याशिवाय हिमाचली चित्र, विणकाम, गालिचे, भरतकाम आणि लाकूडकाम यांचाही समावेश करण्यात आला आहे.’ तसेच या घराची सर्व छायाचित्रे कंगनाने एका प्रसिद्ध हिमाचली छायाचित्रकाराकडून काढून घेतली असून तिने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये याचे श्रेय त्यांना दिले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami