सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील कणकवलीत मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कणकवली पोलीस स्थानकात आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह भाजपच्या १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.राणे यांच्यासहित कार्यकर्त्यांनी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता.याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. भुट्टो वक्तव्यामुळे भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद कोकणातही दिसले.काल, शनिवारी नितेश राणे व भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. मात्र, जिल्ह्यात मनाई आदेश असताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याने नितेश राणे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान,संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. भुट्टो म्हणाले, ‘ओसामा बिन लादेन मेला, पण गुजरातचा कसाई जिवंत आहे आणि तो भारताचा पंतप्रधान आहे’. भुट्टो यांच्या या वक्तव्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भुट्टो यांच्या वक्तव्याचा भाजप नेत्यांकडून निषेध केला जात आहे.