संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

मनसेकडून पुन्हा मशिदीवरील भोंग्याबाबत पोलिसात तक्रार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांसदर्भात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर मुंबई, कल्याणसह राज्याच्या काही भागामध्ये काही मशिदींनी भोंग्यांवरून अजाण बंद केली होती. मात्र, माहीम परिसरात पुन्हा भोंग्यावर अजाण सुरू असून मनसे नेत्यांनी पोलिसात तक्रार केली आहे. विभागप्रमुख यशवंत किल्लेदार यांच्यासह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना निवेदन दिले. याप्रकरणी तातडीने कारवाई केली आहे.

यशवंत किल्लेदार यांनी म्हटले की, आमच्या विभागातील नागरीकांनी आमच्या जवळ तक्रार केली की, सकाळी लाऊड स्पिकरवर अजाण झाली, तसेच स्पिकरचा वापर झाला. पुन्हा न्यायालयाच्या निर्देशाची पायमल्ली केली जात आहे. याप्रकरणी काटेकोर अंमलबजावणी व्हावी. आताचे सरकार हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणात लक्ष घालावे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना मशिदीवरील भोंगे काढण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. तसेच भोंगे उतरवण्यासाठी चार मेचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच मशिदीवरचे भोंगे उतरले, पहाटेच्या अजान बंद झाल्या, दिवसभरातल्या बांगा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या नियमांनुसार कमी आवाजात होऊ लागल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ९२% मशिदींमध्ये मनसेच्या आंदोलनानंतर हा परिणाम दिसून आला. मात्र पुन्हा अजाण सुरू झाल्यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami