उल्हासनगर :- मागील महिन्यात उल्हासनगर शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नेते मनोज शेलार यांना फेसबुकच्या माध्यमातून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेला एक महिना होत असून अखेर काल रात्री हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मनोज शेलार यांनी मागील महिन्यात आपल्या प्रभागात हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमाचे फोटो शेलार यांच्या समर्थकांनी फेसबुकवर शेअर केले होते. या फोटो खाली थॉमस किपकोरिर नावाच्या इसमाने “I will find you and kill you ” अशा शब्दांत मनोज शेलार यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
याप्रकरणी मनोज शेलार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासह हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रारअर्ज दाखल केला होता. दरम्यान अर्जाची चौकशी करून अखेर शनिवारी रात्री हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.