संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

मनमाड-अंकाईचे दुहेरीकरण सुरु ! मेगा ब्लॉकमुळे 15 रेल्वे गाड्या रद्द

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मध्य रेल्वेकडून मनमाड ते अंकाई किल्ल्यादरम्यान दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचा मेगा ब्लॉक आजपासून सुरु झाला आहे. मेगा ब्लॉकमुळे 29 जूनपर्यंतच्या 15 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. ज्यात सर्वाधिक गाड्या जालनाकडे जाणार्‍या आहेत.
या रेल्वे रोटेगाव मनमाड-रोटेगाव, नगरसोल शिर्डी नगरसोल व नगरसोल- मनमाड – नगरसोलदरम्यान रद्द आहेत. 2 रेल्वे मार्ग बदलून धावतील. यात नांदेड- निझामुद्दीन ही रेल्वे 28 जून रोजी नांदेड- औरंगाबाद मनमाडऐवजी पूर्ण-हिंगोली-अकोला भुसावळ अशी धावेल. तर निझामुद्दीन नांदेड रेल्वे 29 जून रोजी औरंगाबाद जालना – परभणी हा मार्ग वगळून धावेल.
रद्द झालेल्या गाड्या
2) 24 जून रोजी श्री साईनगर शिर्डी – विशाखापट्टणम रेल्वे. 3) 25 ते 28 जूनदरम्यान सी.एस.टी. मुंबई – जालना जनशताब्दी एक्स्प्रेस. 4) 26ते 29 जूनदरम्यान जालना – सी.एस.टी. मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, 5) 27 व 28 जून रोजी सी.एस.टी. मुंबई – आदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेस. 6) 26 व 27 जून रोजी आदिलाबाद – सी.एस.व मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस. 7) 27 व 28 जून रोजी जालना – श्री साईनगर शिर्डी रेल्वे 8) 27 व 28 जून रोजी श्री साईनगर शिर्डी – जालना रेल्वे.
9) 24 व 26 जून रोजी जालना – नगरसोल रेल्वे, 10) 24 व 26 जून रोजी नगरसोल – जालना रेल्वे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami