संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

मध्य प्रदेशात पुण्यातील अभियंत्याचा पेटत्या कारमध्ये जळून दुर्दैवी मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बैतुल – मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये एक भीषण अपघात झाला.राणीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैतुल – परासिया राज्य मार्गावर कमालपूर गावाजवळ चालत्या कारला आग लागली,यात पुण्यातील अभियंता असलेल्या तरुणाचा जळून वेदनादायी,दुर्दैवी मृत्यू झाला.सुनील सिंदप्पा (३९) असे मृत अभियंत्याचे नाव आहे.सुनील हे मध्य प्रदेशातील आपल्या सासरवाडीला एका लग्नासाठी गेले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. सुनील सिंदप्पा हे पुण्यातील एका खाजगी कंपनीत अभियंता होते. सुनील एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी सासरच्या घरी मोतीवार्ड, बैतूल येथे गेले होते.हा अपघात गुरुवारी संध्याकाळी घडला, सुनील हनुमान डोल मंदिरातून दर्शन घेऊन परतत असताना बैतुल परसिया राज्य मार्गावरील खामालपूर गावाजवळ त्यांच्या कारला आग लागली आणि कार नियंत्रणाबाहेर होऊन झाडावर जाऊन आदळली. कारचे दरवाजे जॅम झाल्याने सुनील कारमधून बाहेर पडू शकले नाही आणि भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला.रस्त्यावरील वाटसरूंकडून या घटनेची माहिती मिळताच राणीपूर पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि घोडा डोंगरी येथून अग्निशमन दलाची गाडी मागवली, त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. कार पूर्णपणे जळाल्याने चालकाची ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी चेसीस नंबरवरून कारचा नंबर ट्रेस केला, तेव्हा ती गाडी सुनीलच्या नावावर नोंदणीकृत महाराष्ट्र पासिंगची असल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच सुनीलच्या सासरी शोककळा पसरली. शवविच्छेदनानंतर मृत व्यक्तीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.या संदर्भात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami