संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

मध्य, ट्रान्स हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार, ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते वाशी आणि नेरूळ दरम्यान उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान मेगाब्लॉक आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या काही लोकल रद्द केल्या असून काही विलंबाने धावणार आहेत. ब्लॉक काळात ट्रान्स हार्बर बंद राहणार आहे. रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ या कालावधीत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला रेल्वे स्थानकांवर थांबतील. ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी आणि ठाणे ते नेरूळ दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक आहे. त्यामुळे ट्रान्स हार्बरची वाशी, पनवेल सेवा बंद राहणार आहे. या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना त्याच तिकीट, पासावर मुख्य मार्गावरून व नंतर हार्बर रेल्वेमार्गे प्रवासाची मुभा दिली आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा परिणाम लोकल सेवेवर होऊन त्या विलंबाने धावतील, असे रेल्वेने म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami