संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 April 2023

मंत्र्यांवर टीका करणे गुन्हा नाही! मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी टीका केली. त्यानंतर त्यांना अटक देखील झाली. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात संदीप अर्जुन कुडाळे विरुद्ध महाराष्ट्र शासन या खटल्यामध्ये शासनाला फटकारले आहे. मंत्र्यांबाबत निषेध व्यक्त करणे आणि टीका करणे हा गुन्हा नसल्याचे म्हणत शासनाला २५ हजाराचा दंड देखील केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि पि.के. चव्हाण यांच्या खंडपीठाने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अन्यायकारक अटकेबाबत शासनाला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांवर काँग्रेस कार्यकर्त्याने टीका केली होती. या टीकेनंतर त्यांना अटक झाली. म्हणून संदीप अर्जुन कुडाळे यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने शासनाला ताशेरे ओढत दंड देखील ठोठावला आहे. तसेच कायद्याचा वापर हा असंतोष रोखण्यासाठी करावा, कोणाला धमकावण्यासाठी करू नये, अशी तंबी शासनाला दिली.

दरम्यान, या प्रकरणाचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याचे निरीक्षण नोंदवल्यांनंतर कोणताही गुन्हा घडल्याचे सिद्ध होत नसल्याचे म्हणत, गुन्हा घडला असे दिसत नाही. कोणताही अपशब्द वापरला गेला नाही. मतसभेदामुळे गुन्हा नोंदवणे कायदेशीर नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या