संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

मंत्री संजय राठोडांची मोठी अडचण माजी मंत्री संजय देशमुख शिवसेनेत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्याच्या राजकारणात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील रस्सीखेच सुरुच आहे. दोन्ही गट एकमेकांना शह देण्यासाठी निमित्त शोधत असतात. शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड यांना धक्का देण्यास ठाकरे गट सज्ज झाला आहे.यवतमाळ जिल्ह्यातील संजय राठोड यांच्या मतदार संघातील माजी मंत्री संजय देशमुख यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
संजय राठोड यांचे निकटवर्तीय असलेले महंत यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आज संजय देशमुख यांनी शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. संजय देशमुख हे माजी शिवसैनिक आहेत.ते यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघातून १९९९ आणि २००४ अशा सलग दोन टर्ममध्ये अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांच्यासोबत यवतमाळ जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
पक्षप्रवेशानंतर संजय देशमुख यांनी म्हटलं की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात करत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत नक्की चमत्कार पाहायला मिळेल. ज्या पक्षाने मला मोठे केले त्या पक्षाची परिस्थिती पाहता त्यांना मदत म्हणून मी हा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असताना मी माझ्या आईला देखील विचारले ज्या पक्षाने मोठे केले त्यांच्यासोबत असणे गरजेचे आहे असे आई देखील म्हणाली.संजय राठोड यांनी गेल्या वीस वर्षात बंजारा समाजासाठी काही केलेले नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami