संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 05 February 2023

मंत्री चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या! भारतीय वडार समाज संघटनेची मागणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – देशाच्या प्रगतीला मोठे योगदान देण्याचे काम महाराष्ट्राने केला आहे.तसेच फुले, शाहू ,आंबेडकर यांनी महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेणारी विचारधारा दिलेली आहे.अशावेळी राज्य सरकारमधील मंत्री महापुरुषांचा अवमान करीत असून तो वडार समाज कदापि सहन करणार नाही. असे अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी अखिल भारतीय वडार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक शिंदे यांनी केली आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच महापुरुषांबाबत अपमानकारक वक्तव्य केल्याने त्याचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहे,या वक्तव्याचा अखिल भारतीय वडार समाज संघटनेच्या बैठकीमध्ये ठराव मांडून निषेध करण्यात आला.असे अवमानकारक वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे,हे वडार समाज कदापि सहन करणार नाही, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य चुकीचे असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी अखिल भारतीय वडार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक शिंदे यांनी केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami