भिवंडी – मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी भिवंडीजवळ मानकोलीत फुटली आहे. ती दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. याचा परिणाम मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मानकोलीत गळती लागली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. परंतु २४ तास झाले तरी पाणी गळती आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे याचा परिणाम मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.