संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

भिवंडीत प्लास्टिक गोदामाला आग! अग्निशमन दलाच्या ४ गाड्या रवाना

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

भिवंडी :भिवंडी येथील एका प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. ही आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पाेहचल्यात. सध्या आग विझविण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

भिवंडीत दर आठवड्यात एका गोदामाला येथे आग लागते. आगीच्या ज्वाळांनी भिवंडीतील नागरिक होरपळून निघतात. आज पुन्हा भिवंडीतील प्लास्टिकचे गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना झाल्या असून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे. भिवंडीतील प्लास्टिक गोदामाला आज भीषण आग लागली. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरीही आग मोठ्या प्रमाणात लागली आहे. प्लास्टिकच्या गोडाऊनला ही आग लागल्याने आजूबाजूच्या परिसरात धूर मोठ्या प्रमाणात पसरला होता. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य सुरू आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही. भिवंडी येथे अनेक गोडाऊन आहेत. या गोडाऊनमध्ये मोठ-मोठ्या मशिन्ससह अनेक कार्यालये असल्याने येथे मोठ्या प्रमाणात माणसांची ये-जा सुरू असते. मात्र,अनेकदा दुर्लक्षामुळे येथील गोडाऊनमध्ये आग लागते. येथील रस्ते निमुळते आहेत. गोडाऊन एका बाजुला एक असे असल्याने आग पसरत जाते. त्यामुळे एका गोडाऊनला आग लागली की दुसऱ्या गोडाऊनपर्यंत आग पसरत जाते आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते. दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. ही आग कशामुळे लागली याचे कारण देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीचे लाेळ उठले हाेते. त्यामुळे परिसरात धूराचे लाेट पसरले हाेते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami