मुंबई : भिवंडीमध्ये कापूर आणि अगरबत्तीच्या कारखान्याला मोठी आग लागली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावाच्या गोदाम पट्ट्यातील लक्ष्मी कंपाऊंड भागात सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास घडली आहे.अगरबत्तीचा कारखाना असल्यामुळे आग भडकली असून कारखाना जळून खाक झाला आहे.यात जिवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान आगीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भिवंडी, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या एकूण ५ ते ६ बंब दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी आणखी ४ ते ५ तास लागले.या भीषण आगीच्या घटनेमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भीषण आगीत जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचा पोलीस तपास करीत आहेत.