भिवंडी: -भिवंडीतील देवजीनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली होती. ए.डी.टेक्सटाईल या यंत्रमाग कारखान्याला अचानक
भीषण आग लागली. कारखान्यातील कच्चे कापड आणि यंत्रमाग साहित्य जळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या कापड कारखान्यांमध्ये आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अजूनही स्पष्ट झाले नाही.
घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावण्यात आले होते. भिवंडी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. ए.डी. टेक्सटाईल यंत्रमाग कारखाना हा दाटीवाटीच्या परिसरात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात अनेक कारखाने आहे. यंत्रमाग कारखान्यासह इतर वस्तूंचेही कारखाने मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे येथे सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडत असतात. आगीची दहशतीखालीच येथील नागरिक येथे वास्तव्य करतात. परंतु, या आगी कशामुळे लागतात याची कारणे समोर येत नाहीत.