संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

‘भिंडरावाले’चे पोस्टर झळकावत सुवर्ण मंदिराबाहेर खलिस्तानवाद्यांची घोषणाबाजी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चंदिगढ : ऑपरेशन ब्लू स्टारच्या वर्धापनदिनानिमित्त अमृतसरचे छावणीत रूपांतर झाले आहे. ६ जून १९८४ शिखांचे धार्मिक स्थळ असलेल्या सुवर्ण मंदिरात लष्कराने केलेली कारवाई ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ चर्चेत होती.आज ऑपरेशन ब्लू स्टारला ३८ वर्षे पूर्ण झाली तरीही खलिस्तानची मागणी अजूनही सुरूच आहे. सर्व पोलिस दल तैनात असूनही, शेकडो लोक सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. हातात तलवारी घेऊन खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. शहरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान, ऑपरेशन ब्ल्यू स्टारला ३८ वर्षे पुर्ण झाली आहेत. ३८ वर्षांपुर्वा पंजाबमधील शिखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर या वास्तूच्या आत भारतीय सैन्याने खलिस्तानी बंडखोरांविरुद्ध सशस्त्र कारवाई केली होती.आज इतकी वर्षे उलटूनही खलिस्तानची मागणी अजूनही सुरुच आहे.पंजाबमध्ये फुटीरतावाद्यांनी सुवर्ण मंदिरासमोर एकत्र येत भिंडरावाले याच्या फोटोसह घोषणाबाजी केली आहे. ऑपरेशन ब्लू स्टारच्या ३८8 व्या वर्धापन दिनानिमित्त दल खालसा नावाच्या संघटनेनेही ऑपरेशन ब्लू स्टारविरोधात ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत. खलिस्तानी फुटीरतावादी नेता जरनैल भिंडरावाले यांचे पोस्टर आणि तलवारी फिरवण्यास सुरुवात केली. सर्व पोलिस दल तैनात असूनही, शेकडो लोक सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले आहेत. हातात तलवारी घेऊन खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत. हे पाहता अमृतसरच्या सुरक्षेला तडा जाऊ नये म्हणून सध्या पंजाब सरकारने अमृतसरमधील सुवर्ण मंदिराच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी मोर्चेबांधणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अमृतसरच्या सुरक्षेसाठी सुमारे सात हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत.ज्यामध्ये निमलष्करी दलाच्या चार कंपन्यांचाही समावेश आहे. याशिवाय दरबार साहिबकडे जाणाऱ्या बाहेरच्या वाहनांना बंदी घालण्यात आली होती, मात्र तरीही काही लोक दरबार साहिबच्या प्रवेशद्वारावर पोहोचले आणि त्यांनी खलिस्तान समर्थक घोषणा दिल्या. तत्पूर्वी, ‘ऑपरेशन ब्लू स्टार’च्या ३८ व्या वर्धापनदिनाच्या एक दिवस आधी, रविवारी दल खालसा, शिरोमणी अकाली दल यांच्यासह कट्टरपंथी शीख संघटना आणि खलिस्तान समर्थक गटांशी संबंधित सदस्यांनी शहरात ‘आझादी मार्च’ आयोजित केला होता. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भागवत मान यांनी ऑपरेशन ब्लूस्टारच्या वर्धापन दिनापूर्वी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला होता. मुख्यमंत्र्यांनी पोलीस आणि नागरी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी त्यांना ६ जूनपूर्वी राज्यभर सर्वसमावेशक सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यास सांगितले. त्यांनी येथील सुवर्ण मंदिरात प्रार्थनाही केली आणि रविवारी अकाल तख्तचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांच्याशी बंद दाराआड बैठक घेतली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami