संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

भास्कर जाधवांचे प्रसाद लाडना प्रत्युत्तरते भाजपचे असल्याने त्यांना सगळे माफ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – प्रसाद लाड हे भाजपचे नेते असल्यामुळे त्यांनी काहीही बोललेले चालते.आम्ही भाषण केले की फक्त आम्हांला साधन सूची सांगायची किंवा संस्कृती सांगायची ही भाजपची पद्धत आहे. त्यामुळे जे प्रसाद लाड सेना भवन तोडण्याची भाषा करतात ते प्रसाद लाड भाजपचे नेते असल्यामुळे त्यांना सगळ माफ आहे अशी टीका सेनेचे नेते भास्कर जाधव यांनी लाड यांच्यावर केली आहे.

सेनेचे आमदार भास्कर जाधव म्हणजे उद्धव ठाकरे यांचे आयटम गर्ल असल्याची टीका प्रसाद लाड यांनी नुकतीच केली.त्यास आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमदार जाधव म्हणाले आमच्या सर्व सभांना मिळणार प्रतिसाद पाहून भाजप बिथरली आहे. स्वतः उद्धव ठाकरे मैदानात आले की आपला पालापाचोळा होईल या भीतीने प्रत्येक ठिकाणी आमच्यावर गुन्हे दाखल करून आवाज बंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जाधव यांनी नमूद केले.आमदार भास्कर जाधव म्हणाले प्रसाद लाड हे भाजपचे नेते असल्यामुळे त्यांनी काहीही बोललेले चालते. आम्ही भाषण केलं की फक्त आम्हाला साधन सूची सांगायची किंवा संस्कृती सांगायची भाजपची पद्धत आहे. त्यामुळे जे प्रसाद लाड सेना भवन तोडण्याची भाषा करतात ते प्रसाद लाड भाजपचे नेते असल्यामुळे त्यांना सगळ माफ आहे अशी टीका सेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami