संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

भारदस्त आवाजातून बातम्या सांगणारे! सुप्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – भारदस्त आणि संवेदनशील आवाजातून गेली ४२ वर्षांहून बातम्या सांगणारे दूरदर्शनचे सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे निधन आज झाले. सातच्या बातम्यांमधून प्रेक्षकांना राज्य-राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी ते अत्यंत कौशल्याने सहज सांगायचे. ते ६५ वर्षाचे होते.

प्रदीप भिडे यांनी राज्य आणि देशातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींवेळी केलेलं वृत्तनिवेदन आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.बहुतेकदा सातच्या बातम्यांमधून ते प्रेक्षकांना राज्य-राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी सांगायचे. वयाच्या २१ व्या वर्षी भिडे यांनी पत्रकार म्हणून काम करायला सुरूवात केली.दूरदर्शनच्या वृत्तविभागामधे अनुवादक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच मराठी वाड्.मय, नाटके, कादंब-या, एकांकिका या विषयांमधे त्यांना विशेष रूची होती. प्रसार माध्यमात करियर सुरू करावं असा पहिल्यापासूनच वाटायचे.

मुंबईत खार येथे भिडे यांचे सासरे सुभाष कोठारे यांची स्वतःची एक इमारत होती. तिथे त्यांनी ‘प्रदीप भिडे कम्युनिकेशन’ या नावाने ध्वनिमुद्रण स्टुडिओ निर्मिती संस्था सुरू केली. पुढे त्यांनी या क्षेत्रात जम बसवला आणि स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करून जाहिराती माहितीपट आणि लघुपट यावर आपला आवाजचा ठसा उमटवला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami