संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

‘भारत जोडो’ यात्रेत लहान मुलांचा वापर! निवडणूक आयोगाकडे तक्रार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेदरम्यान लहान मुलांचा राजकीय वापर केला जात असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. राहुल गांधी आणि जवाहर बाल मंच राजकीय हेतूने मुलांचा वापर करत आहेत. राहुल गांधींसोबत लहान मुले दिसत आहेत. या संदर्भात सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ आहेत. ज्यामध्ये हे दिसून येते की, लहान मुलांना राजकीय अजेंड्यासह काँग्रेसच्या अभियानात सामील केले आहे.आयोगाने असाही आरोप केला की, यामुळे निवडणूक आयोगाच्या त्या नियमांचे उल्लंघन झाले आहे, ज्यानुसार केवळ प्रौढ व्यक्तीचव्यक्तीचे राजकीय पक्षाचा भाग होऊ शकतात.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने पत्रात म्हटले की, यात्रे दरम्यान लहान मुलांच्या अधिकारांचे प्राथमिकदृष्ट्या उल्लंघन होत आहे. राजकीय अजेंडा पूर्ण करण्यासाठी लहान शोषण केले जात आहे. याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर आणि दीर्घकालिन परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा प्रकार भारतीय संविधानाच्या कलम २१ विरोधात आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या घटनाक्रमाची संपूर्ण चौकशी व्हावी, तसेच तक्रारीत ज्या राजकीय पक्षाचा आणि त्यांच्या नेत्याचा उल्लेख आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami