भोपाळ – काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रा’ मध्य प्रदेशातील इंदुरमध्ये पोहोचली. त्यात आज सकाळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ असलेल्या महू येथे आज सकाळी राहुल गांधी यांनी यात्रेत बाईक चालवली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मध्य प्रदेशातील भारत जोडो यात्रेचा आजचा ५ वा दिवस आहे. रात्री त्यांनी महू येथे मुक्काम केला. त्यानंतर सकाळी त्यांची ‘भारत जोडो यात्रा’ सुरू झाली. त्यात त्यांनी बाईक चालवली.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात पोहोचली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म ठिकाण असलेल्या महू येथे त्यांनी आज सकाळी शान की सवारी म्हणजेच बुलेट चालवली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात राहुल गांधी बाईक चालवत आहेत. त्यांचे सुरक्षा रक्षक धावत रस्ता रिकामा करत आहेत. तिरंगा घेऊन एक व्यक्ती राहुल गांधी यांच्या मागे धावताना दिसत आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नागरिक सहभागी होत आहेत. त्यांच्या यात्रेत एक दिव्यांग व्यक्ती सामील झाली होती. व्हीलचेअरवरील दिव्यांगासोबत राहुल गांधी यात्रेत चालत होते. त्यांची भारत जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेशात आहे. महू येथे मुक्काम केल्यानंतर आज सकाळी त्यांनी बाईक चालवली. त्यांची ही यात्रा इंदुरमध्ये पोहोचली. यात्रेच्या सुरक्षेसाठी १,४०० पोलिस तैनात केले आहेत. जागोजागी बॅरिकेट लावले आहेत. राजबाडा परिसरातील १२ जुन्या इमारती रिकाम्या केल्या आहेत. लोकांची गर्दी वाढली तर इमारत कोसळू शकते. तेव्हा दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी म्हणून जुन्या इमारती रिकाम्या केल्या आहेत, असे पोलिस आयुक्त हरिनारायण मिश्रा यांनी सांगितले.