नवी दिल्ली – ‘भारत जोडो यात्रे’ला मिळालेले यश पाहून काँग्रेस आता नव्या प्रचाराला सुरुवात करणार आहे. प्रियंका गांधी वाड्रा यांच्या नेतृत्वाखाली 26 जानेवारीपासून ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ मोठ्या प्रमाणावर सुरू करणार आहे. काँग्रेसचे अधिवेशन फेब्रुवारीत छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये याचे आयोजन करण्यात येणार आहे,अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार केसी वेणुगोपाल यांनी माहिती दिली.
काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनीही माहिती दिली की 26 जानेवारीपासून ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रदीर्घ मोहीम दोन महिने चालेले. 2023 मध्ये प्रियंका गांधी वाड्रा यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चा दोन महिन्यांसाठी सुरू केले जाईल. 26 जानेवारी 2023 ते 26 मार्च 2023 या कालावधीत देशातील सर्व राज्यांच्या राजधानीत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ संपल्यावर ही यात्रा सुरू होणार आहे. पक्षाच्या धोरणांशी लोकांना जोडणे आणि त्यांना सरकारच्या चुकीच्या धोरणांची माहिती देणे हा त्यामागे उद्देश आहे.