संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

भारत अन्य देशांना ५ जी तंत्रज्ञान पुरवणार! अमेरिकेत निर्मला सीतारामन यांचे वक्तव्य

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात वेगवान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान अर्थात ५जी सेवा भारतात नुकतीच लॉन्च झाली. हि सेवा संपूर्ण स्वदेशी असून ज्या देशांना ती हवी असेल त्यांना आपण पुरवू शकतो, असे विधान अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटले आहे. अमेरिकेतल्या वॊशिंग्टन इथल्या अमेरिकेतील ‘जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड इंटरनॅशनल स्टडीज’मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटले आहे.

भारतातील ५ जी तंत्रज्ञानासाठी स्वदेशी बनावटीच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सुविधांसह तंत्रज्ञान इतर देशांना देण्यासाठी भारत सज्ज असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली आहे. सीतारामन म्हणाल्या, “देशातील या तंत्रज्ञानासाठी दक्षिण कोरियातून काही साहित्य मागवण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही देशाकडून ते येणार नाही. हे संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान असून आगामी काळात ज्यांना ते हवं आहे, त्यांना देता येईल”, असे सीतारामण म्हणाल्या आहेत.

१ ऑक्टोबरला देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ जी सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या तारखेची इतिहासात सुवर्णाअक्षरांनी नोंद होणार असल्याचे सांगतानाच ५ जी तंत्रज्ञानामुळे भारताने दूरसंचार क्षेत्रात जागतिक मानकं स्थापित केली आहेत, असे पंतप्रधानांनी म्हटले होते. २०२४ पर्यंत ही सेवा संपूर्ण देशभरात लागू होणार आहे. भारतीयांना या कामगिरीसाठी अभिमान वाटला पाहिजे असेही यावेळी सीतारामन यांनी म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami