संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

भारतीय संगीतकार रिकी केज यांनी
दुसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार पटकावला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लास वेगास – संगीत क्षेत्रातला सर्वोच्च मानाचा पुरस्कार सोहळा म्हणून ग्रॅमी पुरस्कार ओळखला जातो. यंदाचे वर्ष भारतीयांसाठी विशेष असून भारतीय संगीतकार रिकी केज यांनी पुन्हा एकदा ग्रॅमी पुरस्कार पटकावला. महत्वाचे म्हणजे रिकी यांचा हा दुसरा ग्रॅमी पुरस्कार आहे. हा पुरस्कार स्वीकारताना त्यांनी सर्व उपस्थितांना नमस्कार केला. भारतीय संस्काराचे दर्शन थेट ग्रॅमी मध्ये घडवल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. रिकी यांनी हा पुरस्कार भारताला समर्पित केला.
रॉक लिजेंड स्टीवर्ट कोपलँड यांना ‘द पोलीस ड्रमर’ आणि रिकी यांना ‘डिव्हाईन टाइड्स’ या अल्बमसाठी गौरविण्यात आले. या दोघांनाही ग्रॅमीचा ‘सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम’ पुरस्कार देण्यात आला. यंदा या सोहळ्याचे ६४वे वर्ष असून लॉस वेगास मधील एमजीएम ग्रँड मार्की बॉलरूम येथे हा सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात संगीत क्षेत्रातील अनेक दिग्ग्जांना त्यांच्या संगीतातील योगदानासाठी पुरस्कृत केले जाते. संगीत क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला आवर्जुन उपस्थित राहतात.
या पुरस्कार सोहळ्यातील विजेते असे – सॉंग ऑफ द इयर – बियॉन्से नॉलेस (ब्रेक माय सोल), सर्वोत्कृष्ट पॉप सोलो – अ‍ॅडले (इजी ऑन मी), सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक अल्बम – बियॉन्से नॉलेस (रेनायसान्स), सर्वोत्कृष्ट रॅप अल्बम – केन्ड्रिक लॅमर (मिस्टर मोर्ले अँड द बिग स्टेपर्स), सर्वोत्कृष्ट संगीत अर्बना अल्बम (बॅड बनी – अन वेरानो सिन टी), सर्वोत्कृष्ट समुह सादरीकरण – सॅम स्मिथ आणि किम पेटर्स (अनहोली), सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बम – वीले नेलसॉन – अ ब्यूटीफुल टाईम ,सर्वोत्कृष्ट पॉप वोकलअल्बम – हॅरी स्टाईल (हॅरी हाऊस), सर्वोत्कृष्ट इनसर्विव्ह अल्बम – रिकी केज (डिव्हाईन टाइड्स), सर्वोत्कृष्ट रॅगी अल्बम – द कॉलिंग-कबाका पैयरामिड.

बियॉन्से ३२ वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेती
ग्रॅमी पुरस्कार २०२३’मध्ये बियॉन्सेने पुरस्कार पटकावला. गेल्या ६५ वर्षांत बियॉन्सेने ३२ वेळा या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. या पुरस्कार सोहळ्यात बियॉन्सेला ‘इलेक्टॉनिक म्युझिकअल्बम’ या श्रेणीमध्ये पुरस्कार मिळाला. बियॉन्सेचा मोठा चाहतेवर्ग असून तिची गाणी लोकप्रिय आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या