ओटावा- बॉलिवू़ड कलाकारांसह आता सोशल मीडिया इन्फ्लुन्सरचा मोठा चाहता वर्ग बनत चालला आहे.अशाच एका चाहत्या वर्गाला मोठा धक्का बसला आहे.कारण एका प्रसिद्ध टिकटॉक स्टार तरुणीचे निधन झाल्याची घटना घडली आहे.तिच्या कुटूंबियांनी या संबंधित माहिती सोशल मीडियावर दिली आहे. या घटनेने फॅन्स शॉकमध्ये आहे.भारतीय वंशाची कॅनेडियन टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचे निधन झाल्याची घटना घडली आहे.
मेघाच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून यासंबंधित माहिती दिली आहे.मेघा ठाकूर केवळ २१ वर्षांची होती. सोशल मीडियावर ती तिच्या व्हिडिओंमुळे खूप प्रसिद्ध होती.मेघा सोशल मीडियावर बॉडी पॉझिटिव्हिटीचा प्रचार करण्यासाठी ओळखली जात होती.ती अनेकदा तिच्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असे. टिकटॉकवर तिचे ९३० हजारांहून अधिक फॉलोअर्स होते.मेघाच्या आई-वडिलांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून तिच्या निधनाची माहिती दिली आहे. पोस्टमध्ये ते लिहतात की, “आम्ही जड अंतःकरणाने घोषणा करतो की आमच्या जीवनाचा प्रकाश, आमची दयाळू, काळजी घेणारी आणि सुंदर मुलगी मेघा ठाकूरचे २४ नोव्हेंबरच्या पहाटे अचानक आणि अनपेक्षितपणे निधन झाले आहे.
या पोस्टमध्ये ते त्यांच्या मुलीबाबत सांगतात की, “मेघा एक आत्मविश्वासू आणि स्वतंत्र तरुणी होती. तिची खूप आठवण येईल. तिचे तिच्या चाहत्यांवर खूप प्रेम होते आणि तिच्या निधनाबद्दल तुम्हाला कळावे अशी तिची इच्छा होती. यावेळी आम्ही मेघासाठी तुमचे आशीर्वाद मागतो. तिच्या पुढच्या प्रवासात तुमचे विचार आणि प्रार्थना तिच्या सोबत असतील.”असे तिचे पालक म्हणाले. दरम्यान,ही दुःखद बातमी मिळाल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तर या पोस्टवर आता मेघा ठाकूरला तिचे चाहते श्रद्धांजली वाहत आहेत