संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

भारतीय लष्कराच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – भारतीय लष्कराच्या अनेक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले. ज्यात लष्कराने लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांच्या जागी नवीन उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचेंद्र कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच लेफ्टनंट जनरल एएस भिंडर हे दक्षिण पश्चिम आर्मी कमांडमधून २८ फेब्रुवारी रोजी निवृत्त होत असून सध्याचे व्हाईस चीफ लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांची लेफ्टनंट जनरल भिंडर यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली.

बीएस राजू हे लष्कर उपप्रमुख म्हणून केवळ १० महिने काम करणार आहेत. विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांची पदोन्नतीवर त्यांच्या नवीन कार्यालयात बदली झाली, यानंतर १ मे रोजी त्यांनी उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. लेफ्टनंट राजू यांच्या जागी नियुक्त होणारे लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचेंद्र कुमार हे सध्या लष्कराचे उपप्रमुख आहेत. त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये व्हाईट नाईट कॉर्प्ससह अनेक महत्त्वाचा कार्यभार सांभाळला आहे. दरम्यान, लेफ्टनंट जनरल एनएसआर सुब्रमणी यांना आर्मी कमांडर पदावर बढती देण्यात आली असून त्यांना लखनौमध्ये पुढील केंद्रीय लष्कर कमांडर म्हणून नियुक्त करण्यात आले. सुब्रमणी हे इन्फॅट्री अधिकारी असून ते ‘कठोर टास्कमास्टर’ म्हणून ओळखले जातात.

आजचे हवामान
ताज्या बातम्या