सिंगापूर: -सिंगापूरमधील भारतीय मायलेकींच्या जोडीने 26,000 आइस्क्रीम काड्या वापरून 6 बाय 6 मीटरची रांगोळी तयार केली आहे. त्यांच्या या रांगोळीची सिंगापूर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले गेले. उत्कृष्ट तमिळ विद्वान-कवी या रांगोळीत चित्रित केले आहेत. त्यामुळे या रांगोळीची सर्वत्र चर्चा होत आहे.
मागच्या आठवड्यात, सुधारवीने तिची मुलगी रक्षितासोबत लिटिल इंडिया कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या पोंगल सणानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान नेत्रदीपक रांगोळी सादर केली. रांगोळीत स्वस्तिक, कमळाचे फूल किंवा देव-देवतांची प्रतिमा काढली जातात, परंतु काही लोक या कलाकृतीचे वेगवेगळे प्रयोग करत असतात.प्रसिद्ध तमिळ विद्वान-कवी थिरुवल्लुवर, अववैयर, भरथियार आणि भारतीदासन यांच्या प्रतिमा असलेली ही रांगोळी तयार करण्यासाठी एक महिना लागला. यापूर्वी 2016 मध्ये सुधारवी यांनी 3,200 चौरस फुटांची रांगोळी काढून रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले होते.