संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

भारतासारखं रशियाला लुटायचंय! पुतीन यांचा पाश्चात्यांवर घणाघात

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मॉस्को- भारत आणि आफ्रिकेला लुटले तसे रशियालाही लुटायचे आहे, असा गंभीर आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पाश्चात्य देशांवर केला. रशियाला कमकुवत बनवण्याच्या नवीन संधी हे देश शोधत आहेत, असा घणाघात त्यांनी केला.

युक्रेनचे चार प्रांत रशियाचा अधिकृत भाग म्हणून शुक्रवारी घोषित करण्यात आले. त्यावेळी बोलताना त्यांनी हे चार प्रांत वगळता अन्य गोष्टींबाबत युक्रेनसोबत चर्चा करण्याची आपली तयारी आहे, असे सांगितले. दरम्यान, पुतीन रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत तोपर्यंत रशियासोबत चर्चा करणार नाही, असे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले. युक्रेनचे डोनेस्तक, लुहान्स्क, झापोरिझिया खेरसन हे चार प्रांत रशियात समाविष्ट करण्याच्या करारावर त्यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर बोलताना त्यांनी भारताचा उल्लेख केला. पाश्चात्य देशांनी भारताला लुटले तसे रशियाला लुटून वसाहत बनवायची आहे. रशियाला कमकुवत बनवायचे आहे. जर्मनीतील रशियन गॅस पाईपलाईनची तोडफोड केली, असा गंभीर आरोप त्यांनी केला. रशिया एवढा मोठा आहे की, हे सत्य तो पचवू शकत नाही. युक्रेनचे चार प्रांत रशियात समाविष्ट झाले आहेत. त्यांच्यावर हल्ला झाल्यास तो रशियावर हल्ला समजला जाईल. त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा पुतीन यांनी दिला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami