संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

भाजपला पराभव दिसतोय म्हणूनच निवडणुका लांबणीवर – खा.सुप्रिया सुळे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बारामती – विविध सर्वेंमधून भाजपला निवडणुकांमध्ये पराभव दिसतोय म्हणूनच महानगरपालिका निवडणुका सातत्याने लांबणीवर टाकल्या जात आहेत. शिवाय या प्रशासक राजमध्ये जनता वाऱ्यावर सोडली जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-भाजप सरकारवर केली आहे. आज त्या बारामती दोऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होत्या.

यावेळी त्या म्हणाल्या, मी नेहमीच बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर येते, आजही २३ गावातील कचरा प्रश्नावर आंदोलन करण्यासाठी आले आहे. पत्रकारांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या बारामती दौऱ्याबाबत सुळेंना प्रश्न विचारला असता सुळे म्हणाल्या, मी पहिलंच सांगितले आहे की, त्यांचे बारामती मतदारसंघात स्वागत आहे.

ज्या झाडाला आंबे लागतात त्याच झाडाला लोकं दगडं मारतात, म्हणूनच सातत्याने बारामती टार्गेट होत आहे. पण जनता सुजान आहे, भाजपचा हा खडखडाट बारामतीकरांना चांगला समजतोय, आम्ही आपलं विकासाची कामं सुरूच ठेवणार असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. दरम्यान, शिंदे गटातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक  यांना ईडीने खरंच क्लोजर रिपोर्टनुसार दिलासा दिला असेल आणि सरनाईक कुटुंबीय निर्दोष असेल तर, भाजपने जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami