संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

भाजपमध्ये येण्यापूर्वी  देव-देवतांचा परवानगी घेतली कामतांचे विधान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

गोवा: काँग्रेसच्या 8 आमदारांनी भाजपला प्रवेश केला आहे. त्यात गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही समावेश आहे. भाजपमध्ये सामील होण्यासाठी देवानेच आपल्याला परवानगी दिली असे विधान कामत यांनी केले आहे. निवडून आल्यानंतर भाजपमध्ये सामील होणार नाही अशी शपथ तेव्हा काँग्रेस उमेदवारांनी मंदिर, दर्गा आणि चर्चमध्ये जाऊन घेतली होती. आता निवडून आलेल्या 11 आमदारांपैकी 8 आमदार भाजपवासी झाले आहेत.

कामत म्हणाले की, पितृपक्ष भाद्रपद महिन्यात येतो आणि भाद्रपद हा अतिशय महत्त्वाचा महिना आहे. याचा विचार करून आणि देवाला विचारूनच मी भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान काँग्रेस विधिमंडळ गटाची अधिकृत बैठक होऊन विधिमंडळ गट भाजपात विलीन करण्याचा ठराव घेण्यात आला होता. अखेर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे सत्ताधारी भाजपमध्ये विलीनीकरणास सभापती रमेश तवडकर यांनी मंजुरी दिली आहे. गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्या मंजुरीनंतर दिगंबर कामत, मायकल लोबो यांच्यासह एकूण आठ काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami