संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

भाजपचे धनंजय महाडिक आघाडीच्या आमदार पी.एन. व राजेश पाटलांना भेटले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर – राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांकडून अपक्षांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असताना भाजपचे सहावे उमेदवार धनंजय महाडिक यांनी चक्क महाविकास आघाडीच्या आमदारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे.धनंजय महाडिक यांनी आमदार पी.एन.पाटील,आमदार विनय कोरे,आणि आमदार राजेश पाटील यांची भेट घेतली आहे.तसेच जिल्ह्यातील उर्वरित आमदारांनाही धनंजय महाडिक हे भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान,आमदार पी.एन.पाटील यांनी मात्र आपली भेट झालीच नसल्याचे म्हटले आहे.

पी.एन.पाटील हे करवीरचे कॉंग्रेस आमदार आहेत.तर राजेश पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चंदगड विधानसभेचे आमदार असून विनय कोरे हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे शाहुवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत.धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे उमेदवार जिल्हाप्रमुखसंजय पवार यांच्यात लढत होणार आहे.मतदानाला अवघे चार दिवस उरले असल्याने उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे.धनंजय महाडिक यांनी याआधी बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचीही भेट घेतली होती.उमेदवार असल्यामुळे सर्व मतदारांना मतांसाठी भेटणे माझे कर्तव्य असल्याने जिल्ह्यातील सर्वच आमदारांना भेटणार असल्याचे महाडिक यांनी म्हटले आहे.उद्या सोमवार ७ जून रोजी महाडिक हे आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami