संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

भाऊच्या धक्क्याचे प्रवेशद्वार उघडले! सकाळी ११ ते ७ पर्यंत वाहनांना प्रवेश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : मासेमारी करण्यावर बंदी घातली असतानाही भाऊच्या धक्क्यावर काहीजण मासेमारीसाठी येत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे याला अटकाव घालण्यासाठी २ जून पासून भाऊच्या धक्क्यावरील प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. मात्र प्रवाशांची गैरसोय होत असल्याने मुंबई पोर्ट ट्रस्टने हे प्रवेशद्वार उघडण्याचा निर्णय घेतला असून, सकाळी ११ ते ७ पर्यंत ते खुले राहणार आहे. या काळात वाहनांना आत प्रवेश दिला जाणार आहे. अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टशी संबंधित अधिकाऱ्याने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरील मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय मुंबई पोर्ट ट्रस्टने घेतला. त्यानुसार गुरुवारपासून प्रवेशद्वाराला टाळे लावत बेस्ट बस, टॅक्सीसह खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला. याआधी भाऊच्या धक्क्यावरील तिकीट काऊंटरजवळ बेस्ट बस वा खासगी वाहने उभी राहायची. त्यांना बंदी घातल्याने अलिबाग, ‘जेएनपीटी’ला ये-जा करणाऱ्या प्रवाशांना चालत हे अंतर पार करावे लागत होते. मासेमारीचा बंदीकाळ सुरू असतानाही भाऊच्या धक्क्यावर काहीजण मासेमारीसाठी येत असल्याने त्यांना अटकाव करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण मुंबई पोर्ट ट्रस्टकडून देण्यात आले आहे. मात्र, बेकायदा मासेमारी होत असल्यास ती रोखण्यासाठी पोलीस वा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची मदत घ्या, असे गेट बंद करून काय साध्य होणार आहे, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जाऊ लागल्याने पोर्ट ट्रस्टने निर्णयाचा पुनर्विचार करत, सकाळी ११ ते ७ पर्यंत भाऊच्या धक्क्याचे प्रवेशद्वार खुले ठेवले जाईल असे घोषित केले आहे. मात्र आता मासेमारीसाठी आत येणाऱ्यांवर आता बारकाईने लक्ष ठेवला जाणार असून, पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टशी संबंधित अधिकाऱ्याने दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami