संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

भाऊचा धक्का प्रवेशद्वार बंद! मुंबई पोर्ट ट्रस्टने लावले टाळे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : मुंबईच्या आर्थिक विकासाला चालना देणारा तसेच मुंबईतील जलवाहतुकीचा कणा मानल्या जाणाऱ्या भाऊच्या धक्क्याला टाळे लावले असल्याची माहित समोर आली आहे. याचे कारण या काळात मासेमारी होऊ नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश स्वतः राष्ट्रपतींनीही दिले असतानां, काहीजण भाऊच्या धक्क्यावर मासेमारी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्याला अटकाव करण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने हा निर्णय घेतला असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार,भाऊचा धक्क्यावरील मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय मुंबई पोर्ट ट्रस्टने घेतला असून, त्यानुसार गुरुवारी या प्रवेशद्वाराला टाळे लावण्यात आले आहे. बेस्ट बस, टॅक्सीसह खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र याचा फटका अलिबाग आणि ‘जेएनपीटी’ला ये-जा करणाऱ्या प्रवाशांना होत असून, त्यांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. दरम्यान, भाऊच्या धक्क्यावरील तिकीट काऊंटरनजीक बेस्ट बस वा खासगी वाहने उभी रहायची. आता मात्र, त्यांना मुख्य प्रवेशद्वारातून आत सोडले जाणार नाही. त्यामुळे प्रवाशांना चालत हे अंतर पार करावे लागणार असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सध्या मासेमारी बंदीकाळ सुरू आहे. याकाळात मासेमारी होऊ नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश स्वतः राष्ट्रपतींनीही दिले आहेत. असे असतानाही भाऊच्या धक्क्यावर काहीजण मासेमारी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांना अटकाव करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आले. मात्र, अनधिकृतपणे मासेमारी होत असल्यास ती रोखण्यासाठी पोलीस वा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची मदत घ्या, असे गेट बंद करून काय साध्य होणार आहे, असे प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami