संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 01 February 2023

भरधाव ट्रक उभ्या बसवर धडकला
६ प्रवासी जागीच ठार,१५ जण जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
  • मध्य प्रदेशातील पहाटेची घटना

भोपाळ- मध्यप्रदेशातील लखनऊ-बहराइच महामार्गावर आज बुधवारी सकाळी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने प्रवासी बसला जोरदार धडक दिली.ही धडक इतकी भीषण होती, की बसमधील ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर १५ प्रवासी गंभीर जखमी झाले. यापैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.आज सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.अपघातग्रस्त बस लखनऊहून बहराइचला जात होती.पहाटे धुक्यांमुळे महामार्ग दिसत नसल्याने ड्रायव्हरने बस महामार्गाजवळील एका ढाब्याजवळ उभी केली होती.या बसमध्ये जवळपास २० ते २५ प्रवासी होते. त्याचवेळी भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकने बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की यामध्ये बसचा चक्काचूर झाला.
दरम्यान,अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात आतापर्यंत ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १५ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान, या अपघातानंतर ट्रकचालक हा ट्रकसह घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच ट्रकची ओळख पटवण्यासाठी पोलिस जवळपासच्या ढाब्यांवर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरेही तपासत आहेत. पोलीस अधिकारी डॉ. दिनेश चंद्र यांनी सांगितले की, बस ही रस्त्याच्या कडेलाच उभी होती.त्याचवेळी भरधाव वेगाने आलेला ट्रक हा चुकीच्या दिशेने आला. त्यामुळे हा अपघात झाला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami