संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

भरधाव कंटेनरने विद्यार्थ्यांना चिरडले! एकाचा मृत्यू, दोन जण जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

तळेगाव- तळेगाव- चाकण महामार्गावर वडगाव फाट्याजवळ भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. यात तिथून चालत जाणारे तीन विद्यार्थी चिरडले गेले. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले. मात्र, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला.

तळेगाव दाभाडे येथील स्वराज नगरसमोर रात्री १०:३० च्या सुमारास अपघात झाला. या अपघातामुळे मुंबई-पुणे महामार्गासह, तळेगाव-चाकण महामार्गावर बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती. चाकणहून मुंबईकडे चाललेल्या कंटेनरने दुचाकीला धडक दिली. यात पुढे चालत असलेल्या विद्यार्थ्यांना चिरडले. त्यांनतर हा कंटेनर विरुद्ध दिशेला मातीच्या ढिगा-यावर धडकला. या अपघातानंतर चालक पळून गेला. चिरडलेले हे तीन विद्यार्थी एका अभियांत्रिकी महाविद्यालयात बाईक रॅलीत सहभागी होण्यासाठी आले होते. त्यापैकी मृत्यू झालेला तरुण तामिळनाडूमधील होता. गंभीर जखमींपैकी एकाला नागरे रुग्णालयात तर, दुसर्‍याला सोमाटणे येथील स्पर्श रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या