संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

भयभीत ३० ते ४० हिंदू-पंडित कुटुंबांनी मध्यरात्री काश्मीर सोडले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीनगर – काश्मीरमध्ये हिंदू आणि काश्मिरी पंडितांचे हत्यासत्र सुरूच असल्याने गुरुवारी रात्री जिवाच्या भीतीने ३० ते ४० हिंदू आणि काश्मिरी पंडित कुटुंबांनी काश्मीर सोडले आहे. यामध्ये सरकारी कर्मचार्‍यांचा समावेश असून आजची काश्मीरमधील परिस्थिती ही १९९० पेक्षा भयानक आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न म्हणजे आम्हाला आमच्याच कॉलनीमध्ये का डांबून ठेवण्यात आले आहे? प्रशासन आपले अपयश का लपवण्याचा प्रयत्न करतेय?, असा सवाल संतप्त हिंदू आणि काश्मिरी पंडित कुटुंबांनी उपस्थित केला.

गुरुवारी मुळचे राजस्थानी असलेल्या एका बँक मॅनेजरची काश्मिरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर रात्रीच अनेक खासगी वाहनांमधून केंद्र सरकारच्या योजनांसाठी काम करणार्‍या कर्मचार्‍यांबरोबरच अनेक स्थानिक काश्मिरी पंडितांची कुटुंबे जम्मूच्या दिशेने रवाना झाली. आज पहाटे हे कर्मचारी आणि स्थानिक काश्मिरी पंडित जम्मूमध्ये दाखल झाले. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हत्यासत्र सुरूच आहे. जिवाच्या भीतीने काश्मिरी पंडित व हिंदू नागरिक काश्मीर खोर्‍यातून बाहेर पडण्याची धडपड करत असून स्थानिक प्रशासनाकडे सुरक्षा पुरवण्याच्या मागणीसाठी त्यांनी निदर्शनेही केली. तर काहींनी थेट पलायन केले आहे. अशू नावाच्या एका व्यक्तीने सांगितले की, इथे सुरक्षा कर्मचारीही सुरक्षित नाहीत. अशा स्थितीत सामान्य नागरिकांनी आपली सुरक्षा कशी करायची?

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami