संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

ब्रेकअपमुळे प्रियकराने आत्महत्या केल्यास प्रेयसीवर गुन्हा नाही, उच्च न्यायालयाचा निकाल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर – प्रेयसीने प्रेमात दिलेला दगा प्रियकराला आत्महत्येसाठी प्रवृत्त करतो का? याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. प्रेयसीने प्रेमात दगा दिला म्हणजे तिने प्रियकराला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले, असा त्याचा अर्थ होत नसल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. हा महत्त्वाचा निर्णय देताना नागपूर खंडपीठाने संबंधित तरुणीला दिलासा देत, तिच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्दबातल ठरवला आहे. हा निकाल न्यायमूर्ती विनय देशपांडे आणि पुष्पा गणेडीवाला यांनी दिला आहे.

मिळालेली महिती अशी की, याचिकाकर्त्या तरुणीचे २०१८ पासून प्रणय मोरे नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध होते. याचिकाकर्ती तरुणी एअर हॉस्टेसच्या ट्रेनिंगसाठी लखनऊ येथे गेली होती. याठिकाणी गेल्यानंतर तिचे अन्य एका मुलासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय प्रणयला आला. यावरून दोघांत भांडण झाले. संबंधित मुलीने आपले कोणत्याही दुसऱ्या मुलासोबत प्रेम नसल्याचं प्रणयला समजावून सांगितले. पण प्रणयचे समाधान झाले नाही. दरम्यान, १२ फेब्रुवारी २०२० रोजी प्रेयसी लखनऊ येथे एअर हॉस्टेसची मुलाखत देऊन नागपुरला परतली होती. लखनऊवरून नागपुरात येताच प्रियकर प्रणय तिला कळमेश्वर येथे आपल्या खोलीवर घेऊन गेला. लांबचा प्रवास करून थकल्याने तरुणी आपल्या प्रियकराच्या रुमवर झोपली. ती गाढ झोपेत असताना, प्रणयने त्याच खोलीत गळफास घेत आत्महत्या केली होती. यामुळे कळमेश्वर पोलिसांनी २३ जानेवारी २०२१ रोजी संबंधित मुलीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. यामुळे याचिकार्त्या तरुणीने संबंधित एफआयआर विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. तसेच याचिकाकर्त्या तरुणीला दिलासा देत, तिच्यावर दाखल झालेला गुन्हा रद्दबातल ठरवला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami