संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

ब्रिटीशांचे कौतुक करणाऱ्या अमेरिकनवृत्त निवेदकावर शशी थरूर भडकले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर हे एका अमेरिकन टीव्ही वृत्तनिवेदकावर चांगलेच भडकले.ब्रिटीशांचे कौतुक करत टकर कार्लसन नावाच्या एका वृत्तनिवेदकाने भारतावर अप्रत्यक्ष टीका करण्याचा प्रयत्न केला होता.त्यामुळे शशी थरूर यांनी संयम गमावलेली आणि रागावर नियंत्रण नसणारी माणसंच अशाप्रकारचे वक्तव्य करू शकतात असे म्हणत त्या वृत्त निवेदकाला ट्विटर माध्यमातून चांगलेच खडसावले.
‘ फॉक्स न्यूज ” चॅनेलवरील टकर कार्लसन टुनाईट या टोक शो दरम्यान टकर कार्लसन म्हणाला होता की, भारतातील मुंबईतील व्हिक्टोरिया टर्मिनस ज्याला आपण आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणून संबोधतो. या स्थानकाची इमारत ही ब्रिटीशांनी बांधली आहे.पण भारत आता स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षातही ब्रिटनपेक्षा कितीही बलवान बनला असला तरी अशाप्रकारची इमारत अद्याप कुठेही उभारू शकलेला नाही.टकर कार्लसन याने केलेल्या या टिप्पणीवर सोशल मीडियावर गदारोळ माजल्याचे दिसून आले आहे.यावर शशी थरूर यांनी म्हटले आहे की,खरे तर रागावर नियंत्रण न ठेवता व्यक्त होण्यासाठी एखादी सुविधा ट्वीटरने करायला हवी होती,असे म्हणत त्यांनी चिडलेले लाल इमोजी आपल्या ट्वीटमध्ये दाखवले आहेत.एका ट्विटर वापरकर्त्याने तर असे म्हटले आहे की,खरे तर ब्रिटीश भारतात येण्या अगोदरच भारतात कितीतरी उत्तुंग इमारती आहेत.पण त्याही ब्रिटीशांनी लुटल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे या कार्यक्रमात टकर कार्लसन याने भारतातील तत्कालीन सती प्रथेवरही अज्ञानी भाष्य केले आहे.भारतातील सती प्रथा इंग्रजांनी बंद केली असे त्यांने म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami