संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

ब्रिटनमध्ये चार दिवसांचा आठवडा! येत्या सोमवारपासून अंमलबजाणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लंडन – कर्मचार्‍यांचे आरोग्य राखण्यासाठी 4 दिवसांच्या आठवड्याची नवी योजना लागू करण्याचा निर्णय अखेर ब्रिटेनने घेतला असून येत्या सोमवारपासून ही योजना सुरू होणार आहे. यामध्ये कोणाच्याही पगारात कपात होणार नाही. हॉटेल्स, आर्थिक सेवा देणार्‍या कंपन्या, अशा सर्वच क्षेत्रातल्या कंपन्या या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

या योजनेला प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येत असून यामध्ये ब्रिटनमधल्या 70 कंपन्यांमधले साडेतीन हजारांहून अधिक कर्मचार्‍यांचा सहभाग असणार आहे. ही ट्रायल 100:80:100 मॉडेलवर आधारीत आहे. त्यामुळे आता सर्व कर्मचार्‍यांना 80 टक्के वेळ काम करून 100 टक्के पगार दिला जाणार आहे आणि त्यांना 100 टक्के उत्पादनक्षमता वापरली जाणार आहे.चार दिवसांचा आठवडा हा प्रायोगिक कार्यक्रम थिंक टँक ऑटोनॉमीच्या सहकार्याने, तसेच केम्ब्रिज विद्यापीठ, ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि बोस्टन कॉलेज इथल्या संशोधकांच्या समन्वयाने जागतिक पातळीवर राबवला जाणार आहे. अतिरिक्त सुट्टीबद्दल कर्मचार्‍याच्या भावना काय आहेत, ते कसा प्रतिसाद देतात, याकडे लक्ष दिले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून त्यांचा ताण कमी होतोय का, नोकरी आणि आयुष्याबद्दलचे समाधान, आरोग्य, झोप, ताकदीचा वापर, प्रवास आणि आयुष्यातल्या इतर पैलूंचाही विचार केला जाणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami