संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 27 November 2022

ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांचा ४५ दिवसांनी राजीनामा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लंडन- आठवडाभरापासून प्रचंड दबावाचा सामना करणाऱ्या ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी अखेर आज पंतप्रधानपदाचा राजीनामा जाहीर केला. पुढील पंतप्रधान निवडून येईपर्यंत त्या पदावर राहतील. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या विशेष नियम समितीचे अध्यक्ष सर ग्रॅहम ब्रॅडी यांनी लिझ यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की पक्ष आता त्यांना नेता म्हणून पाहत नाही.लिझ यांनी फक्त ४५ दिवस पंतप्रधानपदावर राहिल्या. याआधी 1827 मध्ये जॉर्ज कॅनिंग 119 दिवस पंतप्रधान होते.

ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी बुधवारी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री क्वासी यांनीही राजीनामा दिला होता. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थान 10 डाउनिंग स्ट्रीटच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मी सत्तेवर आल्यानंतर काही आश्वासने पूर्ण करू शकली नाही याचा मला खेद वाटतो. मी राजा चार्ल्स यांना याबाबत माहिती दिली आहे.दरम्यान, पक्ष आणि त्यांच्या दरम्यान सुरु असलेल्या गोंधळातही लिझ गेल्या आठवड्यात शांत राहिल्या.आता त्यांच्या जागी ब्रिटनचे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक, पेनी मॉर्डाउंट, ग्रँट शॅप्स आणि केमी बॅडेनोक यांचा समावेश असू शकतो,अशी चर्चा आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami