संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी लिझ ट्रस

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लंडन – ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचा पराभव करून 47 वर्षांच्या लिझ ट्रस विजयी झाल्या आहेत. लिझ यांना ब्रिटिश राजकारणातील फायरब्रँड नेता म्हणून ओळखल्या जातात. लिझ या ब्रिटनच्या तिसर्‍या महिला पंतप्रधान आहेत. त्यांच्या आधी मार्गारेट थॅचर आणि थेरेसा मे यांनी पंतप्रधानपद भूषवले आहे. लिझ या मार्गारेट थॅचर यांना त्यांचा आदर्श मानतात. निवडणुकीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यात चुरशीची लढत होती. सुमारे 1.60 लाख सदस्यांनी मतदान केले. लिझ ट्रस यांना 81,326 मते तर ऋषी सुनक यांना 60,399 मते मिळाली. एकूण मतदान 82.6% झाले. पराभवानंतर सुनक पक्षाशी एकनिष्ठ राहून खासदार म्हणून यापुढे काम करणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami