किव्ह – ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ऋषी सुनक यांनी शनिवारी पहिल्यांदाच युक्रेनला भेट दिली. त्यात त्यांनी किव्हमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडोमीर जेलेन्स्की यांची भेट घेतली. युद्धाच्या रणधुमाळीत सुनक यांनी भेट दिल्यामुळे ब्रिटन व युक्रेन यांच्यातील मैत्री किती भक्कम आहे ते स्पष्ट होते, असे जेलेन्स्की यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी शनिवारी युक्रेनला भेट दिली. किव्हमध्ये त्यांची युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत आपल्या देशातील आणि जागतिक सुरक्षेवर आम्ही चर्चा केली. त्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान झाल्यानंतर लगेचच सुनक यांनी युक्रेनला भेट दिली. ही एक सुखद घटना आहे, असे मत जेलेन्स्की यांनी व्यक्त केले. रशियाविरुद्धच्या लढाईत ब्रिटन युक्रेनच्या पाठीशी खंबीर उभा आहे, हे यातून पुन्हा अधोरेखित झाले, असे त्यांनी सांगितले.