संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 28 January 2023

बोरघाटातील अपघातात ट्रक-ट्रेलर
दरीत कोसळले! १ ठार, १ जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रायगड – मुंबई-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. आज पहाटे ५ च्या सुमारास बोरघाटात विचित्र अपघात झाला. ट्रेलर आणि दोन ट्रक एकमेकांवर आदळले. नंतर ट्रेलर व एक ट्रक १०० फूट खोल दरीत कोसळले. त्यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जबर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरून मुंबईकडे येत असलेल्या तीन वाहनांचा बोरघाटात विचित्र अपघात झाला. ट्रेलर आणि दोन ट्रक एकमेकांवर आदळले. अपघातानंतर ट्रेलर व एक ट्रक दरीत कोसळले. त्यात एकाचा मृत्यू झाला. दरीत कोसळलेल्या कंटेनरच्या केबिनमध्ये चालक अडकला होता. अग्निशामन दल व पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करून त्याला दरीतून बाहेर काढले. या अपघातात कंटेनरचालक जबर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami