संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

बोरखळच्या तरुण सरपंचाची आत्महत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सातारा – बोरखळ गावचे तरुण सरपंच आणि पोल्ट्रीफार्म व्यावसायिक अमोल नलावडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.
अमोल नलावडे यांचा जरंडेश्वर मार्गावर पोल्ट्रीफार्म आहे . आणि ते स्वतः बोरखळगव्हे तरुण सरपंच होते. ११ ऑक्टोबरला दुपारी १२ ते १ च्या दरम्यान अमोलचे वडील नथुराम नलावडे हे पोल्टीफार्म मध्ये गेले असता तेथे अमोल गळफास घेतलेल्या स्थित आढळला. त्यामुळे नथुराम याना मोठा धक्का बसला . त्यांनी आरडाओरडा करून आसपासच्या लोकांना बोलावले . त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी अमोलचा मृतदेह सातारा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून अमोलच्या आत्महत्ये बाबत चौकशी सुरंर्रू केली आहे . या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. कारण अमोल हा अत्यंत हुशार आणि कर्तबगार सरपंच म्हणून ओळखला जात असे. मात्र त्याने अचानक असे टोकाचे पाऊल का उचलले यावर गावात उलटसुलट चर्चा सुरु आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami