संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 27 January 2023

बोन मॅरो प्रत्यारोपण उपचारासाठी
टाटा रुग्णालयाचा ३ रुग्णालयाशी करार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – रक्ताची संबंधित गंभीर आजारावर ‘ बोन मॅरो प्रत्यारोपन ” हा यशस्वी उपचार आहे.अशा रुग्णास त्याच्याशी जुळणारा ‘स्टेमसेल”दाता उपलब्ध झाल्यास त्याला नवे आयुष्य मिळू शकते.मात्र अशा उपचारासाठी मुंबईतील टाटा रुग्णालयात येणार्‍या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.त्यांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.त्यामुळे आता टाटा रुग्णालयाने अत्यंत गरजू रुग्णांना दुसर्‍या पाठविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी तीन बाल रुग्णालयांशी करारही केला आहे.त्यामुळे अशा रुग्णांची प्रतीक्षा यादी कमी होणार आहे.
विशेष म्हणजे टाटा रुग्णालयातील दरामध्ये या रुग्णांवर दुसर्‍या रूग्णालयात उपचार केली जातील.टाटा रूग्णालयात दरवर्षी किमान २०० रुग्ण केवळ बोन मॅरो प्रत्यारोपण उपचारासाठी नोंदणी करत असतात.त्यातील वर्षभरात १०० जणांवर असे उपचार करणे शक्य होत असते. त्यातील ७० ते ७५ रुग्ण हे तरुण वयोगटातील आहेत,अशी माहिती टाटा रुग्णालयाच्या बालरोग ओंकोलॉजि विभाग डॉक्टर गिरीश चिन्नास्वामी यांनी सांगितले.टाटा रुग्णालयाने वाडिया रुग्णालय तसेच बोरीवलीचे कॉमप्रिव्हेन्सिव्ह थँलेमेसीया केअर आणि हाजी अली येथील एसआरसीसी रुग्णालयासोबत अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी करार करण्यात आला आहे. ही रुग्णालये टाटा रुग्णालयासारखी गरीब, गरजूसाठी धर्मादाय निधी उभारून असे उपचार करू शकतील.खरे तर बोन मॅरो प्रत्यारोपणसाठी ८ ते १० लाख रुपये इतका खर्च येतो,अशी माहिती टाटा रुग्णालयाचे शैक्षणिक संचालक डॉ.एस.बनावली यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami