संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

बॉलीवूड अभिनेते, दिग्दर्शक
सतीश कौशिक यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते,निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६६ वर्षाचे होते. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली.गंभीर भूमिका करणारा अभिनेता ते हास्य अभिनेता अशी सतीश कौशिक यांची ओळख होती. शिवाय ते दिग्दर्शकही होते. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मितीही केली होती. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
अभिनेते अनुपम खेर आणि सतीश कौशिक यांची गाढ मैत्री होती. अनुपम खेर यांनी ट्विट करून सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. मृत्यू हे या जगाचे अंतिम सत्य आहे. हे मला माहीत आहे. पण माझ्या हयातीत माझा अत्यंत जवळचा मित्र सतीश कौशिक बाबत मी ही गोष्ट लिहीन, याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता, असे अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आमच्या ४५ वर्षाच्या मैत्रीला अचानक असा पूर्णविराम लागला आहे. आता सतिश शिवाय आयुष्य पुन्हा पूर्वी सारखं राहणार नाही, अशी मनातील घालमेलही अनुपम खेर यांनी या ट्विटमधून व्यक्त केली.
सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ मध्ये हरियाणाच्या महेंद्रगड येथे त्यांचा जन्म झाला होता. सतिश कौशिक यांनी आपल्या करीअरची सुरुवात १९८३ मध्ये आलेल्या जाने भी दो यारो या चित्रपटातून केली होती.त्यानंतर त्यांनी १०० हून अधिक चित्रपटात काम केले.१९९३ मध्ये त्यांनी ‘रुप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर त्यांनी डझनभर चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते.त्यांनीअनेक चित्रपटांची निर्मिती केली. सतीश कौशिक यांची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी प्रत्येक प्रकारच्या भूमिका केल्या.मात्र,त्यांच्या विनोदी भूमिका अधिक गाजल्या. त्यांच्या विनोदी भूमिकांना तोड नव्हती. सतीश कौशिक यांची ‘मिस्टर इंडिया’तील ‘कॅलेंडर’ ही भूमिका सर्वाधिक गाजली. त्यांना दोन वेळा बेस्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळालेला आहे. अभिनेता गोविंदासोबतचा त्यांचा कॉमेडीचा टायमिंग अफलातून असायचा. त्यांच्या छोट्या भूमिकाही प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहायच्या.

आजचे हवामान
ताज्या बातम्या