संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

बैलांच्या लसीकरणानंतर उस वाहतूक १ ऑक्टोंबरपासून गाळप हंगाम सुरू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे- शिल्लक उसामुळे गेल्या वर्षी गाळप हंगामाचा कालावधी वाढला होता. त्यामुळे यंदा १ ऑक्टोबरला गाळप हंगाम सुरू केला जाणार आहे. मात्र उसाची वाहतूक करण्यासाठी लम्पी प्रतिबंधक लसीकरण झालेल्या बैलांचा वापर करावा, असे आवाहन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे.
यंदा गेल्या वर्षी इतकेच ऊस लागवडीचे क्षेत्र आहे. त्यामुळे गाळपासाठी तेवढाच वेळ लागण्याची शक्यता आहे. म्हणून १ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू केले जाणार आहेत. १६ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यात उसाच्या वाहतुकीसाठी बैलांचा वापर करताना कोणती खबरदारी घ्यावी याविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. लम्पी आजारामुळे जनावरांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. उसाची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांचे लसीकरण आवश्यक आहे. काही ठराविक भागातच उसाच्या वाहतुकीसाठी बैलांचा वापर केला जातो. परंतु त्यामुळे कोणतीही अडचण होऊ नये यासाठी बैलांचे लसीकरण झाल्यानंतर उसाच्या वाहतुकीसाठी त्यांचा वापर करण्याची परवानगी दिली जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami