मुंबई – बेस्ट प्रशासनातर्फे आता मुंबईकरांसाठी लवकरच १ हजार ई – बाईक उपलब्ध होणार आहेत. बसमधून उतरल्यानंतर इलेक्ट्रिकबाईकने प्रवास करता यावा यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. सध्या पश्चिम उपनगरात ही सेवा सुरू आहे.आता लवकरच मुंबईकरांना या सेवेचा लाभ मिळणार आहे.
बेस्टने याआधी ७०० दुचाकी उपलब्ध करून दिल्या आहेत. या दुचाकींना प्रवाशी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी अजून या ई – बाईक मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे. बेस्टच्या या ई -बाईकचे मूळ भाडे फक्त २० रुपये आहे.प्रति किमी प्रवासासाठी ३ रुपये हे भाडे आहे.ही बाईक चालवण्यासाठी परवान्याची गरज नाही.बाईक अनलॉक करण्यासाठी वोगो अँप वापरावे लागणार आहे.