बेळगाव –
बेळगावात कोबीच्या दारात प्रचंड घसरण झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोबीला किलो मागे 1 रुपयांवर मिळत असल्याने बेळगाव तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या कोबीच्या शेतात शेळ्या आणि मेंढ्या सोडल्या.
गेल्या आठवड्यापासून बेळगाव तालुक्यात कोबीच्या दरात मोठी घसरण सुरु आहे. कवडीमोल बाजारभावामुळे गुंतवलिले भांडवल तर दूर तोडणी, मंजुरी आणि वाहतुकीचा खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जाफरवाडी, काकती, होनगा, कडोली, अगसागा, कंग्राळी, देवगिरीसह आजाबाजूच्या गावातील अनेक शेतकऱ्यांनी कोबी फ्लॉवरच्या उभ्या पिंकांमध्ये जनावरे सोडली आहेत. मेंढपाळांनी मुक्काम सध्या कोबींच्याच शेतात केला आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कोबीला हामीभाव मिळावा, अशी मागणी केली आहे.