संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

बेळगावात ‘कटल्या’च्या रिंगणाचा पारंपारिक सीमोल्लंघन सोहळा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बेळगाव : पंढरपूरच्या वारीमध्ये जसे घोड्याच्या रिंगणाचे वैशिष्ट्य असते त्याचप्रमाणे बेळगावातील सीमोल्लंघनाचे मोठे वैशिष्ट्य आहे.बेळगावात सीमोल्लंघनदिनी ‘कटल्या’ बैलाचे रिंगण होते हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी हजारो लोक हजर असतात. बुधवारी विजयादशमीला हा रिंगण सोहळा सायंकाळी ज्योती कॉलेजच्या मैदानावर पार पडला.

बेळगावमध्ये चव्हाट गल्लीला तिथे चव्हाटा देवस्थान असल्याने विशेष मान आहे.कोल्हापूरच्या जोतिबाच्या यात्रेत अग्रस्थानी असणारी सासनकाठी चव्हाट गल्लीतील देवघरातूनच निघते. चव्हाट गल्लीत बेळगावचे देवघर आहे. या देवघराचे ‘देवदादा’ म्हणजे पहिले पुजारी. ते ध्यानस्थ बसून ज्योतिर्लिंगाची आराधना करायचे. प्रत्येक महादेवाच्या मंदिरात किंवा समोर दगडाचा नंदी असतो मात्र आपल्या घरासमोर जिवंत नंदी असावा, या कल्पनेतून देवदादांनी बैल पाळण्यास सुरुवात केली. याच नंदी बैलाला ‘कटल्या’ म्हणून ओळखतात. कटल्या म्हणजे अंगाने मोठा असलेला. सुमारे 200 वर्षांपासून बेळगावच्या चव्हाट गल्लीत नंदी बैल ऊर्फ कटल्याची पूजा करण्याची प्रथा आहे.विजयादशमीदिवशी कटल्या आणि कोल्हापूरच्या जोतिबाच्या चव्हाट गल्लीतील सासनकाठीची धर्मवीर संभाजी चौकातून मिरवणूक निघते. ती ज्योती कॉलेजच्या मैदानावर पोहोचते. तिथे आधी कटल्याचे रिंगण होते. त्यानंतर कटल्या आपट्याच्या पानांची रास शिंगांनी विसकटतो. त्यानंतर तीच पाने घेऊन बेळगावकर एकमेकांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतात.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami