संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

बेंगळुरूला पावसाने झोडपले अनेक ठिकाणी पूरपस्थिती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बेंगळुरू:देशात अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे तर दुसरीकडे काही राज्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. बेंगळुरूमध्ये रविवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बंगळुरूमधील अनेक भाग पाण्याखाली गेले. बेंगळूरूसह अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपले. या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बेंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील महत्त्वाच्या जंक्शनवर वाहतूक कोंडी झाली. शहरातील अनेक भागात पाणी साचले असून जनजीवन ठप्प झाले आहे. रिंगरोड, प्रमुख रस्ते, पॉश भागांसह सर्वच ठिकाणी पाणी तुंबले आहे. ढगफुटीमुळे हा पाऊस झाल्याचा अंदाज आहे. भीषण वाहतूक कोंडीत मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्याचबरोबर कॅबसोबतच इतर सेवांवरही पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. संततधार पावसामुळे हैराण झालेल्या नागरिकांना मेट्रो स्थानकाचा आसरा घ्यावा लागला आहे.
पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुरामुळे बंगळूरु शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बंगरुळू सरकारकडून बचावकार्य हाती घेण्यात आले असून, पुरात अडलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. दरम्यान, ग्रेटर बंगळुरू महानगरपालिकेने शहरातील परिस्थिती पाहता हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. टोल फ्री १५३३ रेन हेल्पलाइनप्रमाणे काम करेल. याशिवाय बीबीएमपी ने २४×७ हेल्पलाइन क्रमांक (२२६६००००) आणि व्हाट्सएप क्रमांक ९४८०६८५७०० जारी केले आहेत. पाण्यामुळे होणार्‍या समस्या लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी रहिवाशांना घराबाहेर पडणे टाळावे आणि मुलांना शाळेत पाठवू नये, असे आवाहन केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami